सध्या चित्रपटसृष्टीत बायोपिकचा जणू पाऊसच पडत आहे की काय असं वाटू लागलेय. संजू, द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर, दंगल, नीरजा,'मांझी: द माउनटेन मॅन, भाग मिल्खा भाग, मेरी कोम' या चित्रपटानंतर आता भारताची प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा हिच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेत्री कतरिना कैप पी. टी. उषाची भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पी.टी. उषाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सर्वात प्रथम देसी गर्ल प्रियंका चोप्राला विचारण्यात आलं होतं. मात्र तिनं नकार दिल्यानंतर कतरिनाला विचारण्यात आल्याचे समजतेय.
कतरिनानेही अद्याप या भूमिकेसाठी होकार दिलेला नाही. रेवती वर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. याआधी त्यांनी तामीळ आणि मल्याळम भाषेतील काही चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.