विवेक ची ही पोस्ट अत्यंत लाजीरवाणी - उर्मिला मातोंडकर

Update: 2019-05-21 07:31 GMT

एक्झिट पोलवरुन अभिनेता विवेक ओबेरॉयने आक्षेपार्ह मीम ट्विटरवर पोस्ट केल्याप्रकरणी सर्वच स्थरावरून त्याच्यावर टीका झाली. यावर राजकीय नेत्यांसह बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील त्याला विरोध केला. राज्य व केंद्रीय महिला आयोगानेदेखील त्याला नोटीस पाठविली आहे. यावरती काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीदेखील ट्विटरद्वारे विरोध दर्शवला. विवेकने सोशल मीडियावर सलमान खान, ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा समावेश असलेली मिम्स पोस्ट केली होती.

"हे अत्यंत लाजीरवाणे! विवेक ही पोस्ट चुकीची आहे. हा बरोबर मार्ग नाही. जर तुम्ही माफी मागत नसाल तर निदान पोस्ट डिलीट करण्याची सभ्यता तरी दाखवा”

 

 

 

असं ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.

 

Similar News