पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या 'रोड शो'दरम्यान झालेल्या हाणामारीत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचं वागणं इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसैनसारखं आहे अशी टीका केली. दरम्यान भाजप कार्यकर्त्या प्रियांका शर्मा आणि दिल्लीचे प्रवक्ता तजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक झाल्यानंतर विवेक ओबेरॉय यानं ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.
ममता दीदींविषयी सर्वानाच आदर आहे मात्र अशी स्त्री अचानक सद्दाम हुसैनसाखी का वागतेय? तर ही लोकशाही इतर कोणामुळे धोक्यात आली नसून 'डिक्टेटर दीदी'मुळे धोक्यात आली आहे,
असं म्हणत विवेक ओबेरॉय यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली.
https://twitter.com/vivekoberoi/status/1128545129994678272