जातपंतायतविरोधी लढा देणाऱ्या निर्भीड कार्यकर्त्या दुर्गा गुडीलू यांच्या आईचं दु:खद निधन
जातपंचायती विरोधात उभ्या ठाकणाऱ्या निर्भिड कार्यकर्त्या दुर्गा गुडीलू यांच्या आई अंकुबाई (६६) यांचं आज १३ मे रोजी दुःखद निधन झालं. जात पंचायतीची दहशत, बालविवाहाची प्रथा, पंचाचे अजब न्याय, शिक्षणाचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या वैदू समाजात दुर्गा गुडीलू या सुधारक म्हणून भूमिका बजावत आहेत. कायद्यानं गुन्हा असणारी पण वैदू समाजात सर्रासपणे आजही चालणारी बालविवाहाची प्रथाही दुर्गा यांनी हाणून पाडली आणि अनेक मुलींना या जाचातून मुक्त केलं. त्यांच्या या संघर्षात त्यांच्या आईचा भक्कम पाठींबा मिळाला.