aarey forest : सई ताम्हणकर म्हणतेय “बसा बोंबलत”

Update: 2019-10-07 11:26 GMT

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने तेथील वृक्षांची कत्तल सुरू केली आणि शनिवारपर्यंत हजारो वृक्ष तोडले गेले. त्यानंतर दिवसभर त्याचे पडसाद सगळीकडेच उमटले. सोशल मिडियावरही अनेकांनी संताप व्यक्त केला. अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील ट्विटरच्या माध्यमातून आरेतील वृक्षकत्तलीवर तीव्र शब्दांत राग व्यक्त केला आहे.

“कापा... सगळी झाडं कापा.. नंतर बसा बोंबलत.” अस म्हणत सईने ट्विटरवर राग व्यक्त केलाय. तसेच “जेवढी झाडं कापतायत तेवढीच परत लावणार का?” असा सवाल देखील तिनं प्रशासनाला विचारला आहे. वृक्षतोडीच्या कारवाईमुळे पर्यावरणवादीच नाही तर सर्वच स्तरांवर संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

Similar News