महिला आणि युवकांच्या प्रश्नांवर अधिक भर

Update: 2020-01-08 08:50 GMT

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये श्रीवर्धन मतदारसंघाच्या युवा आमदार आदिती तटकरे यांनी काल उद्याेग,खनिकर्म, क्रिडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार राज्यमंत्री पदाचा पदभार दु.०३.०० वाजता स्वीकारलं.राज्याच्या नवनियुक्त राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मॅक्सवूमनजवळ बोलताना

"युवक कल्याण खातं देखील मला दिल्यामुळे युवकांच्या, तरुणांच्या समस्या सोडवण्याकडे जास्त कल असेल. किंवा जनतेच्या समस्या प्रमाणिकपणे सोडवेन . राजकीय पार्श्वभूमी आणि वडिलांचं मार्गदर्शन असल्यामुळे नक्कीच मला फायदा झालाय. पवार साहेब, अजित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मला इथे येण्याची संधी मिळाली म्हणून त्यांचे देखील मी आभार मानते. उद्योग खात्याची देखील जबाबदारी असल्यामुळे युवक युवतींसाठी प्रयत्न कारेन त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नानांबाबत सतत पाठपुरावा कारेन आणि युवतींचा सुरक्षिततेचा प्रश्न देखील मोठा आहे यावर जबाबदारीने काम कारेन . वडिलांच मार्गदर्शन जरी असलं तरी आम्ही आमच्या परीने काम करत असतो आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही प्रामाणिक पणाने काम करा. माझा राजकीय प्रवास स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हापरिषद, ते आमदार, आणि आता मंत्री"

असा प्रवास असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

 

https://youtu.be/0yPk9F0nOro

 

 

 

 

 

 

Similar News