भाजपच्या भोपाळ येथील खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून नेहमी चर्चेत असतात. मात्र आता त्यांना एक अनोळखी संशयीत धमकी पत्र मिळाल्याचे समोर आले आहे. हा पत्र उर्दूमध्ये आलेला असून पत्राबरोबर एका चिठ्ठीत पावडर सारखा पदार्थ देखील पाठवला गेलेला आहे. या पत्रामध्ये साध्वी प्रज्ञा यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत. त्यावर फुली मारण्यात आलेली आहे. पोलिसांनी हे पत्र ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहे. यावर साध्वी प्रज्ञा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली
"या अगोदर देखील अशा प्रकारचे धमकी पत्र मला आले होते. मी वेळोवेळी पोलिसांमध्ये तक्रार दिली मात्र कोणतीच कारवाई झाली नसल्याचे"
साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1216794207710375938?s=20