एखादा फोन कॉल तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देऊ शकतो. बिझनेस एडीटर असलेल्या सुप्रिया श्रीनेत यांना एक कॉंल आला. आणि एक पत्रकार असलेल्या सुप्रिया श्रीनेत सक्रीय राजकारणात आल्या.
28 मार्चला सकाळी अचानक सुप्रिया श्रीनेत यांच्या मोबाइलची रिंग वाजली आणि महाराजगंज मधुन निवडणुकीची तयारी करा असं त्यांना फोनवरून सांगण्यात आलं . या फोन कॉलने दहा मिनिटांत व्यावसायिक संपादक सुप्रिया श्रीनेत यांना नेता बनवलं. आज, त्या महाराजगंजमधील काँग्रेसच्या उमेदवार म्हणून परतापुर शहरात मतांसाठी घरोघरी जाऊन मत मागत आहेत..