कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सोशल मीडियाचा सातत्याने वापर करत आहेत. कोरोनासंबंधी माहिती देण्यासाठी आणि महत्वाच्या घोषणा करण्यासाठी उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांवर लाईव्ह येऊन जनतेशी संवाद साधत असतात.
- उद्धव ठाकरे आपल्या घरातले बीग बॉस- तृप्ती देसाई
- पंकजा मुंडे म्हणतात फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीत ‘हे’ आहे अंतर
- अनाथांची माय सिंधुताईंनी केली उद्धव ठाकरेंचं तोंडभरुन कौतुक
नरेंद मोदी (Narendra Modi) यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे १४ एप्रिल रोजी संध्याकाळी लाईव्ह आले. यावेळी एका मुलीने त्यांना त्यांचा मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला. इन्स्टाग्रामवर लाईव्ह सुरू असतांना एका मुलीने कमेंट केली, "मी सिंगल आहे. आदित्य सिंगल आहे का?"
यानंतर शांत राहील तो सोशल मीडिया कसला. या कमेंटचा स्क्रीनशॉट आता फेसबुक व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.