चिमुकलीचे आंरतराष्ट्रीय स्पर्धेत नाचायचे स्वप्न परिस्थितीने भंगवले.
इच्छा शक्तिने राष्ट्रीय नृत्य स्पर्धा जिंकवली, परिस्थितीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मुकवली.;
राष्ट्रीय नृत्य स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिकं मिळवूनही केवळ आर्थिक विवंचनेमुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मुकावं लागण्याची वेळ एका ११ वर्षांच्या मुलीवर आली आहे. वर्ध्यामधील रागिणी ठाकरे हिला केवळ पैसे नसल्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोडावी लागली आहे. रागिनी विकास ठाकरे ही सध्या ११वर्षांची आहे. वयाच्या ५ व्या वर्षापासून संपूर्ण भारतभर तिने नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन ६ स्पर्धा जिंकल्या आहेत.
यानंतर तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही जाण्याची संधी मिळाली होती. पण घरची परिस्थिती नाजूक असल्याने तिला जाता आले नाही. रागिणीचे वडील इलेक्ट्रिशीअन आहेत. तर आई घरकाम करते. आपल्या मुलीला आर्थिक पाठबळ मिळाले तर रागिणी देशाचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास तिच्या आई-वडिलांना वाटतो.