वय जास्त झाले की बहूतेकजन तब्येतीची काळजी करतात व निवांत वेळ घालवण्याकडे भर देतात. परंतू पश्चिम ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या 75 वर्षाच्या आजीने विनी सॅम्पी यांनी नुकतंच वाहन चालवण्याचा परवाना मिळवला आहे.
या आजी त्यांच्या तरूण वयातच गाडी चालवायला शिकल्या होत्या. परंतू त्यावेळी त्यांनी लायसेन्स मिळवण्याचा विचार केला नाही. परंतू आता त्यांची बहिण आजारी असल्याने तिला वारंवार हॉस्पिटल मध्ये घेवून जावं लागत असल्यामुळे विनी यांनी ड्रायव्हिंग लायसन मिळवण्याचा निश्चय केला. वय जास्त असल्याने विनी यांना परवाना मिळवण्यात अडचणी आल्या. मात्र, त्यांना हिडलॅण्डमधील ब्लवूड ट्री असोसिएशन या संस्थेने मदत केली आणि त्यांची नजर चांगली असल्याने त्या परवाना परिक्षेतील वाहतूक नियमांसंदर्भातील चाचणीतही सहज उत्तीर्ण झाल्या.