आपल्या स्वरांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि अवघ्या सिनेसृष्टीला लाभलेलं वरदान आणि भारताची कोकीळा अशी ओळख असणाऱ्या लता मंगेशकर यांच्याबद्दल जाणून घ्या या पाच गोष्टी…
1. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी हेमा नावाने जन्म घेतला. त्यानंतर वडिलांच्या भावबंधन नाटकात त्यांनी लतिका नावाचे पात्र निभावल्यामुळे त्यांना लता हे नाव पडले.
2. लता दीदींचे शालेय शिक्षण हे फक्त एकच दिवस झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी बहीण आशा आणि इतर शाळकरी मुलांना गाणी शिकवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना रागावून शाळेतून काढून टाकले.
3. 1942 साली त्यांनी चित्रपटांसाठी गाणी गायला सुरवात केली होती. ‘साली महल’ या चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ या गाण्यानंतर लता मंगेशकर एका रात्रीत स्टार गायिका म्हणून उदयास आल्या. हे गाणं आजही गाण्यासाठी सर्वात कठीण गाणं म्हणून ओळखलं जातं.
4. गुलाम हैदर हे लता दीदींचे गॉडफादर असल्याचं त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. गुलाम हैदर यांनी त्यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि त्यांना गाण्यासाठी प्रोत्साहन दिले.
5. लता दीदींना पहिला राष्ट्रीय पुरस्कार ‘परिचय’ चित्रपटासाठी गायलेल्या गाण्यांसाठी मिळाला. आजपर्यंत त्यांनी साधारण 14 पेक्षा जास्त भाषांमध्ये जवळजवळ 50 हजार गाणी गायली आहेत.