जग भ्रमंती करणारे आपण अनेक जण पाहतो... अनेकांनी आपली ही आवड व्यवसायातही बदललेली आहे. आज आपण अशा तिघींना भेटणार आहोत ज्यांना जग तर माहिती नाही पण जग फिरण्याची मज्जा त्या घेत आहेत. तेही कुठल्या विमान, बस, रेल्वे किंवा रॉयल अशा सुविधेतून नाही तर चक्क रिक्षातून... आहे की नाही मजेदार तुम्ही कधी केली का अशी जग भ्रमंती... परदेशातून आलेल्या जॉर्जी, सुर्फी आणि एमेली या तिघी कलरफुल रिक्षातून निघाल्या आहेत जगसवारीला... भारत खूप कलरफुल आहे... इथली संस्कृती भावणारी असून इकडे लोक खूप मस्त आहेत. आम्ही मैत्रिणी न्यूझीलंडवरुन आलो आहोत भारताची सवारी करण्यासाठी असं त्यांनी सांगितलं. परदेशी नजरेतून नेमका कसा दिसतो भारत? चला तर जाणून घेऊयात त्यांच्याकडून या भन्नाट, मजेदार आणि गंमतीशीर जगभ्रमंतीविषयी… पाहा हा व्हिडिओ...
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/323625961678498/