महिला सुरक्षेसाठी २५२ कोटी

Update: 2019-06-18 10:38 GMT

राज्यात महिलांवरील वाढत्या गुन्हयांच्या घटनांना आळा घालण्यासाठी ‘महिला सुरक्षितता पुढाकार’ योजना तीन वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. या योजनेवर रु. 252 कोटी इतका खर्च अपेक्षित असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासह त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याचा निर्णय या योजनेत असेल. तसेच पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्याकरीता १८ हजार ९२२ पोलीस शिपायांची रिक्त पदे भरण्यात आली आहेत. तसेच ४ हजार ६४९ पदे यावर्षी भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

Similar News