निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केला असता या याचिकेवरील सुनावणीत म्हटले की २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही. हा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने सांगितले. मात्र चार दोषींच्या फाशीची तारीख अखेर ठरली असून १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता या चारही दोषींना फाशी दिली जाणार आहे. आज (शुक्रवारी ) राष्ट्रपतींनी त्याचा दयेजा अर्ज फेटाळल्याने चौघांना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून १ फेब्रुवारीला या चारही आरोपीना तिहार तुरुंगात या चारही दोषींना फाशी दिली जाणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1218130208831623169?s=20