सुमित्रांचा वेलकम होम तर श्रावणीचा मोगरा फुलला चित्रपट प्रदर्शित

Update: 2019-06-15 10:39 GMT

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक दिग्दर्शक आहेत मात्र महिला दिग्दर्शिकांची संख्या फारच कमी आहे. त्यात एकाच दिवशी जर दोन महिला दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शित झाले की प्रक्षेकांना भन्नाट सिनेम्यांची मेजवानीच मिळातेय.

मराठी दिग्दर्शिका श्रावणी देवधरचा यांचा कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेल्या प्रेमकथेतून मोगरा फुलला तर दुसरीकडे सुमित्रा भावे आणि सुनील सुखठणकर यांनी चित्रपट वेलकम होम प्रदर्शित केला आहे. 14 जूनला हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे.

मोगरा फुललाच्या निमित्ताने श्रावणी देवधर पुन्हा दिग्दर्शनाकडे वळत आहेत. या आधी त्यांनी लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात स्वपनील जोशी आणि नीना कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत.

सुमित्रा भावे यांनी चित्रपट हे समाजाच्या संवेदनशीलतेला स्पर्श करण्याचं माध्यम आहे असं मानून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट लिहिले, दिग्दर्शित केले. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी या मुख्य भूमिकेत आहेत.

Similar News