पहिल्या मॅचमध्ये 0 वर बाद होणाऱ्या, क्रिकेटर मिताली राज बाबत जाणून घ्या 10 बाबी
भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली आता विश्वचषकावर आपलं लक्ष केंद्रीत करणार आहे. मितालीने आत्तापर्यंत ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये महिला संघाचं कर्णधार म्हणून नेतृत्त्व केलं. यामध्ये २०१२ (श्रीलंका), २०१४ (बांगलादेश) आणि २०१६ (भारत) या तीन टी-२० विश्वचषकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव मोठं करणारी मिताली राज आता देशाला 2021 मध्ये विश्वचषक मिळवून देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीच तिनं टी -20 मधून निवृत्ती घेतली आहे. आंतरारष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव मोठं करणाऱ्या मिताली राज बद्दल जाणून घ्या 10 महत्वाच्या बाबी
1 राजस्थान मधील जोधपूर येथे 3 डिसेंबर 1982 मध्ये जन्मलेली मिताली सध्या भारताच्या वन डे टीमची कॅप्टन आहे.
2 मितालीने भरतनाट्यम चे प्रशिक्षण घेवून अनेक स्टेज शोज् केले आहेत. मात्र, पुढे तिचं लक्ष क्रिकेटकडं वळल्यामुळं आता ती भरतनाट्यम पासून ती दुरावली आहे.
3 तिचे वडील डोराई राज इंडियन एअरफोर्समध्ये अधिकारी होते. त्यांनी मिताली ला क्रिकेटसाठी प्रोत्साहित केलं.
4. 1999 मध्ये मिताली राज ने वन डे क्रिकेट मॅच मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता, ही मॅच मिल्टन किनेस आयलॅंड मध्ये झाली होती. या सामन्यामध्ये मितालीने नाबाद 114 धावा केल्या होत्या.
5. 2001-2002 ला लखनऊमध्ये इंग्लंड च्या विरूद्ध मितालीने प्रथम टेस्ट मॅच खेळली. या मॅचमध्ये मिताली शुन्यावर बाद झाली होती.
6. 17 ऑगस्ट 2002 मध्ये तिने वयाच्या 19 व्या वर्षी तिसऱ्या टेस्टमध्ये रोल्टनचा 209 या जगातील सर्वोच्च वैयक्तीत टेस्ट स्कोर चा रेकॉर्ड मोडत 214 धावांचा विक्रम केला.
7. T-20 या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 हजारापेक्षा जास्त धावा करणारी मिताली राज ही, भारतातील पहिली महिला ठरली.
8. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 धावांना पार करणारी मिताली ही एकमेव महिला क्रिकेटर आहे.
9. एकदिवशीय सामन्यात सलग सात अर्धशतके झळकवणारी मिताली ही एकमेव महीला खिलाडी आहे.
10. मिताली ला 2004 मध्ये ‘अर्जून पुरस्कार’ देण्यात आला होता त्यानंतर 2015 मध्ये तिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानीत केलं.