Unwanted गोळ्या म्हणजे काय बाई?



Unwanted गोळ्या म्हणजे काय? आज कालच्या तरुण मुली या गोळीचं जास्त सेवन का करतात? त्याचे दुष्परिणाम काय? वाचा शर्मिला येवले यांचं निरीक्षण

Update: 2021-04-06 19:49 GMT

नेहमीसारखा आजचा दिवस उजाडला. काही एक गडबड नव्हती. कारण रात्रीच उशीरा समजलं की, पुण्यात लाॅकडाऊन असणार म्हटल्यावर कुठे जाण - येणं नव्हतं. गप्प घरात बसणं. परंतु तरी सकाळी 9-9:30 च्या दरम्यान मी माझ्या घराजवळच्या मेडिकल मध्ये गेली. कारण काय तर माझ्या रोजच्या अस्थमा आणि thyroid च्या गोळ्या आणि औषध संपलं होतं आणि गोळी तर महत्त्वाची होती ती घेणं गरजेचं... बरं ते मेडिकलवाले पोरं ही मला गेली 2-3 वर्षापासून चांगली ओळखतात. कारण माझे सगळे औषधं तेच महिन्याच्या सुरुवातीला मागवतात. तर तसंच त्यांनी माझे औषध या ही वेळेला आणून ठेवली होती.मी गेली तसं त्यांनी ओळखलं. ताई औषध का? मी लांबूनच 'हो' बोलली. 

माझ्या अगोदरच एक ग्राहक तिथं उभा होता. त्याचं वय साधारण 22-25 च्या दरम्यान असेल. तरूणच होता. तर तो तिथे मेडिकल मध्ये unwanted ची गोळी मागत होता. त्याच्या बरोबरची मुलगी मात्र गाडीतच बसून होती. ती ते सगळं बघत होती. त्यांने गोळी घेतली पैसे दिले आणि तो गेला. मी तेवढ्यात दुकानातील शुभमला बोलली…

 डोके फिरलेत पोराचे…. आपण काय करतो? आपण कसल्या गोळ्या खायला देतो? त्याने मुलींच्या शरीरावर किती भयंकर स्वरुपाचे परिणाम होतात? किती घातक असतात या गोळ्या वैगेरे….

 यावर शुभम बोलला खरं आहे. पण काय करणार? यांनाच अक्कली नाही. तर नाव कुणाला ठेवणार.

आईवडिलांना की आणखी कुणाला..? जाऊ द्या म्हणे असं म्हणत तो आत गेला आणि औषंध घेऊन आला. मी औषध घेतली आणि निघाली. त्याला म्हटलं मी मोबाईल वर विसरली. तरी घरी गेल्यावर तुला गुगल पे करते..

 तो बोलला…'ताई चालेल…'



 आता खरं मला जे मांडायचं आहे ते म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या म्हणजेच unwanted असेल. I pill असेल किंवा आणखी कुठल्या पण या गोळ्यांचे होणारे परिणाम पोरापोरीना माहिती आहे का.? तर 5% पोरापोरींना सुध्दा याचे दुष्परिणाम माहित नसतील. फक्त केवळ मज्जा मारायची म्हणून ही विकृती करायची आणि पुढे काही नको म्हणून गोळ्या खायच्या. तरी काही झालंच तर मज्जेतून घेतलेल्या आनंदातून राहिलेल लेकरू एकतर मारून टाकायचं किंवा जन्माला आलं की उघड्यावर सोडून निघून जायचं.वाह..रे बहादर पोरं…



…आणि त्याहून ही मुलीच्या आयुष्यावर,शरीरावर होणारे परिणाम काही दिसत नाही. मुळातच महाराष्ट्रातील ब-याच मुली अशा एका फेज मधून जात आहे. पण ते त्या कुणाला कळू देत नाही किंवा आपल्याला नाही. नाही येत तर चांगल ना उगीच कशाला 4-5 दिवस तो त्रास असा आनंद व्यक्त करतात..

 पण तरीही DW हिंदी चॅनेलचे एका मुलाखतीत इशा सनन यांनी या गोष्टीवर अगदी मनमोकळ्या पद्धतीने चर्चा केली. त्यावरून असं दिसून आलं की गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्याने मुलींच्या शरीरावर होणारा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा गंभीर दुष्परिणाम म्हणजे वारंवार या गोळ्या सेवन केल्याने मुलींच्या मासिक पाळीत मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. मग मासिक पाळी आली तरी रक्तस्त्राव न होणं असो किंवा गर्भाशयात काही तरी आजार उत्पन्न होणं.. बरं इतकंच नाही तर बरेचदा मुलींना मासिक पाळी 2-3 महिने येतच नाही.

याचा त्या मुलींना फार मोठेपणा वाटतो. ही काय मोठेपणा घेऊन मिरवायची गोष्ट आहे का? ही गोळी तुमचा जीव घेऊ शकते. हे या मुलींना कसं समजत नाही. फक्त मज्जा मारायची तेवढ चांगलं समजतं.यावर हद्द म्हणजे आपल्या आईला ही मुली सांगत नाही की, मला या महिन्यात मासिक पाळी आली नाही किंवा बहुतेक आई आपल्या मुलीला विचारत ही नाही की तुला पाळी आली की नाही?  याबाबत माझं वैयक्तिक एक मत आहे. जर काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या घरी आईला बोलायला हवं किंवा तुम्ही सुज्ञ असाल तर तुम्ही एखाद्या महिला स्त्री रोग तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे.

असो आपल्याला काय त्याचं अस बोलू फक्त मज्जा करून हा विषय संपत नाही. जर तुम्हाला मौजमजा करायचीच आहे ना तर बाकी सुद्धा बरेच पर्याय बाजारात उपलब्ध आहे. परंतु या गोळ्या देणं,घेणं आणि खाऊ घालणं तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे.

  

मी या सगळ्या गोष्टीवर मोकळ्या पद्धतीने बोलू शकते. कारण या गोष्टीत आमच्या घरात आमचे पालक आमच्यासोबत वेळोवेळी सुसंवाद साधत असतात.

लेखन-: कु.शर्मिला सुभाषराव येवले

विद्यार्थिनी फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे.

मो.नं -: 7038443776

मेल -: Sharmilayewale1998@gmail.com

Tags:    

Similar News