पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा पथदर्शी मार्ग म्हणजे बाबासाहेब: रेणुका कड
स्रियांकडे व्यक्ती म्हणून पाहणारे डॉ. बाबासाहेब… ;
'स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजित असतो. म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे.' हे वाक्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं. कोणत्याही समाजाची प्रगती महिलांच्या प्रगतीशिवाय होऊ शकत नाही. असा महान विचार मांडणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडरांची जयंती. बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या दिवशी 14 April 1891 ला जन्म झाला. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे इथल्या दलित शोषितांबरोबरत महिलांसाठी इतिहासातील सोनेरी सकाळच म्हणावं लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने इथल्या शोषितांसाठी कार्य केले. त्याच पद्धतीने देशातील स्त्रियांसाठी देखील खूप मोठे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी आजही प्रेरणादायी आहेत.
सामाजिक कार्य करणाऱ्या रेणुका कड डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात कसे प्रेरणादायी आहेत? असं सांगताना भारावून जातात… माझ्यासाठी बाबासाहेब म्हणजे काळ्याकुट्ट अंधारामध्ये एक ज्योत पेटावी असं व्यक्तीमत्व म्हणजेस बाबासाहेब…
सामाजिक क्षेत्रात स्त्री, बालक आणि तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेतून न्याय कसा मिळवून देता येतो? हे बाबासाहेबांनी मला शिकवल्याच्या भावना रेणूका कड यानी आजच्या दिवशी व्यक्त केला आहे.