आरती आमटे यांच्या वृद्धाश्रम सुरु करण्याच्या निर्णयाला मंदाकिनी आमटे यांचा नकार का होता?

Update: 2023-05-16 01:59 GMT

 नोकरी नाही तर आई-वडील व आजोबांसारखं काहीतरी सामाजिक काम करायचं आणि लोकांची सेवा करायची हे आरती आमटे यांच्या मनात पक्क होतं आणि याच निर्धारातून निर्णय घेतला वृद्धाश्रम सुरू करण्याचा. ज्यावेळी वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या आई म्हणजेच मंदाकिनी आमटे यांनी हे सर्व डोक्यातून काढून टाक, हे काही करू नको असं सांगितलं होतं. आता आमटे कुटुंब आणि समाजकार्य यांचं नातं आपल्याला माहितीच आहे, मग असा असताना आरती आमटे यांना हे काम करण्यापासून मंदाकिनी आमटे थांबवण्याचा का प्रयत्न करत होत्या? त्यापाठीमागे नक्की त्यांचा काय हेतू होता पाहुयात..

आस्था फाऊंडेशनची स्थापना, त्यात आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात हा सविस्तर प्रवास स्वतः आरती आमटे यांनी मुंबईत आयोजित MaxWoman Convlave या कार्यक्रमात बोलताना सांगितला. सामाजिक कार्याचा वसा बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांच्याकडून पुढे नेत नेण्याचं काम आज आरती आमटे करत आहेत. पण हेच काम ज्यावेळी त्यांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्या आईसोबत घडलेला एक प्रसंग त्यांनी या कार्यक्रमात सांगितला. सर्वात प्रथम कॉलेज संपताच आरती आमटे यांनी वृद्धाश्रम आणि गरजू महिलांसाठी काम करण्याचं ठरवलं. हा निर्णय जेव्हा त्यांनी प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे (Prakash Amte and Mandakini Amte) यांना सांगितला. तेव्हा मंदाकिनी आमटे यांनी त्याला विरोध केला. काय होतं याचं कारण?

अमरावतीत एका कार्यक्रमासाठी प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे दोघेही आले होते. याच कार्यक्रमात आरती आमटे (Arti Amte) यांनी वृद्धाश्रम सुरू करण्याबाबतचा निर्णय सांगितला.. त्यानंतर आईने हे काम करणं तुला सोपं वाटतं का? एखाद्या लहान मुलाला आणि वृद्धाला सांभाळणं अत्यंत कठीण आहे. तू हे काही करू नकोस. तुझ्या डोक्यातून हे काढून टाक. इतकं मोठं काम करण्याचा निर्णय घेत असताना एका आईच्या ह्रदयाने काळजीपोटी हा सल्ला दिला.. यापाठीमागे. आणखीन एक कारण होतं ज्यावेळी आरती आमटे यांनी हा निर्णय घेतला त्यावेळी त्यांची मुलं लहान होती. त्यामुळे मंदाकिनी आमटे यांनी वृद्धाश्रम सुरू करण्यासाठी सुरुवातीला नकार दर्शवला होता. पण आपल्या निर्णयावर आरती आमटे थांब होत्या त्यांनी प्रकाश आमटे यांच्याशी चर्चा केली आणि वडिलांनी नेहमीप्रमाणे हे काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आई-वडिलांच्या प्रोत्साहनाबरोबर त्यांना खंबीर साथ होती ती म्हणजे त्यांच्या पती उद्य. यांची.. अशा प्रकारे आरती आमटे यांनी हा निर्णय घेतला आणि आज आपण पाहतो आहोत त्यांच्या माध्यमातून अनेक गरजू वृद्धांना आश्रय देण्याचे काम त्या करत आहेत..

Tags:    

Similar News