डॉ. आनंदीबाई जोशी अकाली वारल्यानं प्रॅक्टीस करू शकल्या नाहीत. प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ. रखमाबाईं सावे-राऊत होत्या. १८६४ साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. बालपणी झालेला विवाह रखमाला मान्य नव्हता...
त्यांनी कोर्टात लढा दिला. ब्रसेल्सला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन {एम.डी.} पूर्ण केलं. त्यांनी मुंबईत कामा हॉस्पीटल, सुरत आणि राजकोटमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून वयाच्या नव्वदीपर्यंत काम केले. तरीही त्यांची उपेक्षा का झाली? रखमाबाई ओबीसी होत्या म्हणून त्यांच्याकडे समाजाने दुर्लक्ष केलं का?
असा सवाल हरी नरके यांनी उपस्थित केला आहे.