मरणाच्या दारात आशेचा किरण निर्माण करणं म्हणजे काय असतं पहा.. | Aarti Prakash Amte

Update: 2023-05-17 02:02 GMT

 आपले वडील दारू पितात, आईला मारतात हे सगळं एक पंधरा वर्षाचा मुलगा आपल्या डोळ्यांनी पाहत होता. नुसतं पहातच नव्हता तर तो हा भयावह परिस्थितीला तोंड देत होता. मुलाला शिकायचं होतं, काहीतरी करायचं होतं, स्वतःच्या पायावरती उभे राहायचं होतं. मात्र त्याच्या आजूबाजूची सगळी परिस्थिती भयंकर होती. वडिलांच्या दारून संपूर्ण घर बरबाद होण्याच्या मार्गावर होते. वडिलांच्या रोजच्या दारूला कंटाळून या १५ वर्षाच्या लेकराने विष घेऊन जी संपवण्याचा प्रयत्न केला.. अशा अस्वस्थेत त्याची माउली त्याला दवाखान्यात घेऊन आली होती. दवाखान्यात असताना त्याला सामाजिक कार्यकर्त्या आरती आमटे भेटल्या त्या मुलाच्या अशा,आकांक्षा मोठ्या होत्या, बाप दारुडा असला, आईला मारझोड करत असला तरी त्या मुलाची स्वप्न फार मोठी होती. पण रोज रोज तेच पाहून तो आपला जीव संपवायला निघाला होता. ज्यावेळी आरती आमटे त्यांना भेटल्या त्यावेळी त्यांनी त्याचे मतपरिवर्तन केले.. या सगळ्या प्रसंगानंतर त्या मुलाचे शेवटचे चार शब्द डोळे पाणवणारे होते..

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक अनुभव सामाजिक कार्यकर्त्यांना येत असतात अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आरती आमटे यांनी सुद्धा एक भयावह अनुभव मॅक्स वुमन आयोजित MaxWoman Conclave मध्ये बोलताना शेअर केला. एक पारधी समाजाचा मुलगा साधारण पंधरा वर्षांचा होता. त्यानं विष पिलं होतं. त्याच्यावरती दवाखान्यात उपचार सुरू होते. यावेळी आरती आमटे यांनी त्याला विचारलं की, तुझ्यावरती विष घेण्याची वेळ का आली? त्यावेळी त्यांना सांगितलं मला खूप शिकायचं आहे. पण माझे वडील दारू पिऊन सगळे पैसे वाया घालवतात. हा हे सगळं खरंच बोलतो आहे का? हे पाहण्यासाठी आरती आमटे त्याच्या आईला भेटल्या आणि त्याच्या आईला विचारलं तर आईने देखील हेच सांगितलं. मुलगा माझा हुशार आहे त्याला शिकायचा आहे पण त्याचे वडील सर्व पैसे दारूत वाया घालवतात.

ही सगळी परिस्थिती पाहता त्या क्षणी त्या मुलाला मानसिक आदराची गरज होतो. त्या मानसिकतेतून त्याला बाहेर काढणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याच्यासोबत तसा संवाद होणे गरजेचे होतं. हेच ओळखून आरती आमटे यांनी त्याच्याशी संवाद साधला आणि आत्महत्या करणे हा अंतिम पर्याय नाही हे त्याला पटवून दिले. तुला शिकायचं आहे, तुला स्वतःच्या पायावरती उभे राहायचं आहे, तर तू काहीतरी काम कर आणि त्या कामातून मिळालेल्या पैशातून तुझं शिक्षण पूर्ण कर. तुला काही मिळत नसेल तर तू माझ्याकडे ये तुला जी काही मदत लागेल ते तू मला सांग. अडचणी या सगळ्यांना आहेत जशा मला अडचणी येतात तसेच सगळ्यांना अडचण येतात.. प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत पण त्याच्यावरती उपाय म्हणून आत्महत्या करणे हा पर्याय नाही.

अशाप्रकारे त्या मुलाची समजूत काढल्यानंतर तो मुलगा दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तो घरी जात होता त्यावेळी आरती आमटेंना भेटला त्यावेळी त्यानं मी काहीतरी नक्की करेन, दहावी पास झाल्यानंतर मी खरंच काहीतरी चांगलं करेन..असा शब्द त्याने दिला. वडिलांच्या दारुमुळे आत्महत्या करण्यासाठी निघालेला मुलगा त्याच्याशी प्रेमाने चार शब्द बोलल्यानंतर, त्याला समजावून सांगितल्यानंतर आत्महत्या करण्याचा विचार करणारा मुलगा दवाखान्यातून जाताना आशेचा एक नवीन किरण घेऊन, मनात नवीन जिद्द घेऊन बाहेर पडत होता. खरंच दुःखात चार शब्द बोलणं आधार देणं हे फार मोठं काम आहे. आणि आपण सगळ्यांनी अशा प्रकारे अडचणीत असलेल्या लोकांना मदत केली पाहिजे हाच एक या पाठीमागचा संदेश आहे... आरती आमटे यांच्या जीवनातील असेच आणखीन काही प्रसंग तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही मॅक्स वूमनच्या फेसबुक व youtube पेजला नक्की भेट द्या..

Full View


संपूर्ण विडिओ पाहा ... 

Full View

Tags:    

Similar News