बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीचा सामना होण्याची शक्यता
यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाच्या खासदार अजित पवार यांची बहीण सुप्रिया सुळे या दोन्ही नणंद-भावजया यांच्यात बारामती लोकसभा निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता नाकरता येणार नाही, याचे कारण सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकी बाबत बारामतीत दोन महिला उमेदवारत जोरदार लढत होणार असल्याची चर्चा आहे.
सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्यामुळे उमेदवारीची शक्यता
बारामतीतील एका कार्यक्रमात सुनेत्रा पवार म्हणाल्या, "बारामतीकर माझ्यावरही प्रेम करतील. तुम्ही मला एक संधी द्याल अशी आशा मी बाळगते." या वक्तव्यामुळे त्या निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांनीही मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. "खासदार होण्याच्या दोन वर्षांपूर्वीपासून मी या मतदारसंघाचे दौरे करत होते. माझे बारामतीकरांशी गेल्या १८ वर्षांचे हितसंबंध आहेत," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दोन्ही नेत्यांच्या मजबूत बाजू आशा आहेत की, सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या समर्थनाचा फायदा मिळू शकतो, तर सुप्रिया सुळे यांच्याकडे अनुभव आणि मतदारसंघाशी असलेला 18 वर्षांचा संबंध यामुळे लढत ही अटीतटीची होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संभाव्य सामना निश्चितच चुरशीचा आणि मनोरंजक असेल. या दोन्ही नेत्यांमध्ये कोण बाजी मारते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.