मुंबई इंडियन्स नीता अंबानींची कमाईची मशीन!

Update: 2024-03-22 09:30 GMT

22 मार्च पासून आयपीएलची सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या नावावर करोडोचा व्यवहार चालतो. यात रिलायन्स फौंडेशनच्या नीता अंबानींचा मोठा पुढाकार असून त्यांची मुंबई इंडियन्स टीम आहे. टीम सोबतच त्यांच्याकडे जिओच्या माध्यमातून प्रसारणाचा अधिकार देखील आहे. यावरून आपण हा विचार करू शकतो की आयपीएल मधून नीता अंबानी किती पैसा कमावत असतील ? 

नीता अंबानी यांनी मालकत्व स्वीकारलेली मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय फ्रँचायझी टीम आहे. नीता आणि मुकेश अंबानी यांच्या मालकीची असलेली ही टीम 5 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावून इतिहासातील सर्वात यशस्वी टीम बनली आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 2008 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम 916 कोटी रुपयांना विकत घेतली होती. आता या घडीला मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू 10,070 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ, नीता अंबानींनी या टीममधून 9,154 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वाधिक कमाई करणारी टीम आहे.

या वर्षी, नीता अंबानी यांच्या रिलायन्सने व्हायकॉम१८ Viacom18 द्वारे Jio सिनेमासाठी आयपीएल (IPL) चे डिजिटल अधिकार 5 वर्षांसाठी 23,758 कोटी रुपयांना खरेदी केले असून, यातून अंबानींना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती $9,710 कोटी डॉलर एवढी आहे.

मुंबई इंडियन्सची यशस्वीता ही त्यांच्या संपत्ती आणि साम्राज्यात भर घालणारी आहे. मुंबई इंडियन्स ही केवळ क्रिकेट टीम नाही तर अंबानींच्या कमाईची मशीन आहे. या टीमने त्यांना प्रचंड आर्थिक लाभ दिला आहे आणि भविष्यातही तेच होत राहील यात शंका नाही.

Tags:    

Similar News