मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोरोना काळात पती मयत झालेले एकल महिला व एकल विधवा महिलांसाठी पंचायत समितीचे मिटींग हॉल मध्ये कायदे विषयी माहिती व्हावी यासाठी विधी सेवा प्राधिकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तहसीलदार अनिल गावित, गटविकास अधिकारी भरत कोसोदे, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, बाल प्रकल्प अधिकारी श्री धनगर ऍडवोकेट पाटील, ऍडवोकेट बाविस्कर या शिबिरात महिलांना शासकीय योजनांसंदर्भात व प्रॉपर्टी तसेच आपला हक्क संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. शिबिरात ऍडवोकेट बाविस्कर, तहसीलदार अनिल गावित गटविकास अधिकारी भरत कोसोदे आदींनी विस्तृत मार्गदर्शन केले या शिबिराला एकल महिला व एकल विधवा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.