"प्रिय साक्षी, आज खास तुझ्यासाठी लिहिणार आहे"

पत्नीच्या वाढदिवसानिमीत्त आभिनेता सुशांत शेलारची भावनीक पोस्ट वाचा काय म्हटलय सुशांतने;

Update: 2020-12-31 08:30 GMT

तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!

तुझी खूप इच्छा होती की मी लिहावं म्हणुन आज खास तुझ्यासाठी लिहिणार आहे.

माझ्या वयाच्या १८ व्या वर्षी तू माझ्या आयुष्यात आलीस. आणि आजपर्यंत माझ्या पाठीशी माझी पत्नी म्हणुन खंबीरपणे उभी आहेस.

अनेक वादळे आली आणि गेली. तू सोबत होतीस आणि आहेस. struggling च्या काळापासून ते यशस्वी होताना सुद्धा. कधी मैत्रीण बनून तर कधी पत्नी कधी कधी तर आई बनून सुद्धा. माझ्या आईला सुद्धा एक मैत्रीण, सून, मुलगी बनून तू तुझी भूमिका बजावत असताना मी तुला पाहिलं आहे.

अगदी पप्पा आजारी असताना त्यांचे हॉस्पिटल ने-आण करण्यापासून ते त्यांच्या ट्रिटमेंट पर्यंत सगळ्या गोष्टी तू केल्यास. माझं शूटिंग सुरू असायचं. फार adjust व्हायचे नाही. पण तू तुझी shift adjust करायचीस.

सकाळ पासून सुरू होणारा तुझा कामाचा पसारा सकाळी अन्वी चा शाळेचा डब्बा, मग नाश्ता, तुझं ऑफिस, रात्रीच जेवण, आणी मी आल्यावर अर्ध्या रात्री मला आवर्जुन जेवायला वाढून देणं. (आजकालच्या काळात एव्हढं कोणी करत नाही)

पण ते तू आजही करतेस. त्यासाठी तुझे कितीही आभार मानले तरी कमीच. तुझी एकच तक्रार असते की मी दुनियादारी बंद करावी. पण ते शक्य नाही हे तुलाही माहीत आहे. कारण दुनियादारी न करता मला जगणे मुश्किल आहे.

Career करताना तू म्हणालीस की मी journalism करते. तू industry मध्ये काम कर. दोघं एकत्र industry च्या भरवश्यावर नाही राहू शकत. मी नोकरी करेन असं ठरवून खूप मोठा support दिलास. आणि त्यामुळे मी जे काही कलेच्या क्षेत्रात चांगले काम केले ते आई, वडील आणि तुझ्यामुळेच.

तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात तू नेहमीच काही ना काहीतरी शिकत राहिलीस. आणि आजही शिकते आहेस आमच्यासाठी. तुझ्या ह्या वृत्तीमुळे तू खूप यशस्वी होशील ह्याची मला खात्री आहे.

अजून काय लिहू..

तू ग्रेट आहेस.

माझ्या आयुष्यात येऊन माझी पत्नी, अन्वीची आई आणी माझ्या आई वडिलांची सून झालीस हे मी आमचं भाग्य समजतो.

पुन्हा एकदा जन्म दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 😘😘😘

तुझा

सुशांत

Tags:    

Similar News