अखेर WhatsApp ची माघार..
WhatsApp ने प्रायव्हसी पॉलिसी अपडेटला दिली स्थगिती;
WhatsApp या सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅपनं मागील काही दिवसांपासून नवं गोपनीयता धोरण लागू करण्यासाठीची पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. यासाठी युझर्सना हे धोरण स्वीकारण्यासाठीचं आवाहनही करण्यात आलं. तसा मेसेजही अनेकांपर्यंत पोहोचला. WhatsAppचं हे नवं धोरण न स्वीकारणाऱ्यांचं अकाऊंट बंद होणार असल्याची बाबही स्ष्ट करण्यात आली होतं.
"WhatsApp च्या नवीन गोपनीयता धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त आहे. आता आधीच्या तुलनेत युझर्सचा अधिक डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल" असं व्हॉट्सअॅ पने सांगितलं होतं. यातून गोंधळ उडाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
पण आता WhatsApp ने आपल्या नव्या धोरणांना स्थगिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार यामुळे युजर्संना पॉलिसी संबंधी जाणून घेण्यासाठी आणि त्याची समिक्षा करण्यासाठी जास्त वेळ मिळेल. व्हॉट्सअॅपने सांगितले की, लोकांमध्ये या अपडेटची चुकीची माहिती जास्त पसरली आहे. त्यामुळे कंपनीने प्रायव्हसी अपडेट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.