टेरासीन महिला उद्योगिनीच्या मदतीला

Update: 2023-08-19 04:38 GMT

कमी कालावधीत आपल्या सर्व सावेशकतेसाठी प्रसिध्दी मिळवलेले हॅाटेल टेरासीन हे आता महिला उद्योगिनीच्याही मदतीला येणार आहे. नुकतेच पुण्यात टेरासीनच्या संस्थापीका डॅा.सोनम कापसे यांनी महिला उद्योगिनीसाठी चालवण्यात येणाऱ्या या व्यासपिठाचे उध्दघाटन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मेहुल चिमठणकर तसेच प्रीती पवार यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला तसेच यावेळी मोठ्या संख्येने महिला उद्योगिना उपस्थित होत्या.

यावेळे महिलांसाठी बिनामुल्य व्यासपीठ उपलब्ध आपण का उपलब्ध करतोय याबद्दल डॅा. सोनम कापसे म्हणतात, ‘आजच्या स्त्रिया ७० ते ८०% ग्राहक खरेदीचे निर्णय घेतात आणि काम आणि उद्योजकीय क्षेत्रावर आक्रमण करत आहेत. परंतु महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय साजरे करण्यासाठी विनामूल्य प्लॅटफॉर्म उपलब्ध नाहीत आणि तसेच अशा सुरक्षीत जागेचे महत्व लक्षात घेवुन टेरासीने महिलांच महिलांसाठी हा उपक्रम हाती घेत आहे.”

प्रमुख पाहुणे मेहुल यांनीही महिलाना उद्योग उभा करतांना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी याबद्दल मार्गदर्शन केले तर प्रीती पवार यांनी आपण उद्योगिनी म्हणुन घडतांनाचा प्रवासबद्दल सांगितले. उपस्थित महिलांनीही अनुभव कथन करत आपल्या मनातील प्रश्नांचे निरसन केले.

या व्यासपिठाचा अधिकाधीक उपयोग करुन घ्यावा असे आवाहन टेरासीन न इंडिया मिलेट च्या संस्थापिका डॅा.सोनम कापसे यांनी केले.

Tags:    

Similar News