मुस्लिम मुलींचे शिक्षण हे अर्ध्यावरती थांबण्याचे प्रमाण देखील फार मोठे आहे. या पाठीमागे उर्दू शाळांची संख्या हे कारण आहे का? अनेक उर्दू शाळा चौथी पर्यंत आहेत. चौथी नंतरचे शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे अनेक मुलींचे शिक्षण थांबले जाते. अनेक ठिकाणी दहावीपर्यंत उर्दू शाळा आहेत मात्र दहावीनंतर वेगळ्या माध्यमातून मुलींना शिकावे लागतात हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे उर्दू माध्यमाची पाठ्यपुस्तक उपलब्ध नसल्यामुळे अनेक मुलींना आपलं शिक्षण अर्ध्यावर थांबवावं लागतं. मुलींच्या शिक्षणाबाबत नक्की काय समस्या आहेत यासाठी काय करावे लागेल या संदर्भातले डॉ. सय्यद तबसुम यांचे विश्लेषण नक्की पहा..