महिलेच्या भगिरथ प्रयत्नातून बचतगट आणि ग्रामोद्योगांना मिळाली हक्काची बाजारपेठ
महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्यात अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून नवी चळवळ उभी राहत आहे. मात्र ग्रामिण उद्योजक आणि महिला बचत गटांच्या मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी, यासाठी अहमदनगर शहरात माधुरी चोभे यांची खरेदीवाला मेगामार्ट ही अनोखी संकल्पना यशस्वी झाली आहे.