फोर्ब्सच्या रिचेस्ट सेल्फ मेड वूमन 2019 च्या यादीत या भारतीय महिलांची नावं
फोर्ब्सने नुकत्याच अमेरिकातील रिचेस्ट सेल्फ मेड वूमन - 2019 ची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय वंशाच्या तीन महिलांचा समावेश आहे. या यादीत भारतीय वंशाच्या जयश्री उलाल, नीरजा सेठी आणि नेहा नरखेड़े यांचं नाव आहे.
जयश्री उलाल
कॉम्पुटर नेटवर्किंग फर्म अरिस्ता नेटवर्क्सच्या अध्यक्ष आणि सीईओ जयश्री उलाल या यादीत १८ व नंबर आहे. उलाल यांच्या नावे ९६६० कोटी रुपयांची संपत्ती आहे. उलाल यांच्याकडे अरिस्ता कंपनीचे 5% शेयर आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार लंडनमध्ये जन्मलेल्या आणि भारतात वाढलेल्या उलाल या आता अमेरिकाच्या सर्वात श्रीमंत महिला अधिकाऱ्यांच्या यादीत सामील झाल्या आहेत.
नीरजा सेठी
आईटी कंसल्टिंग अॅन्ड आउटसोर्सिंग फर्म सिंटेलच्या को-फाऊंडर नीरजा सेठी अमेरिकेच्या रिचेस्ट सेल्फ मेड वूमन यादीत 23 व्या नंबर वर आहेत. त्यांची संपत्ती 6900 करोड रुपये आहे. नीरजा आणि त्यांचे पती भारत देसाई यांनी 1980 मध्ये 2000 डॉलरने सिंटेल कंपनीची सुरुवात केली होती. फ्रांसची आईटी कंपनी एटॉसला 340 करोड़ डॉलरला सिंटेलने खरेदी केले आहे. यामध्ये नीरजाला त्यांच्या हिस्सयेचे शेयर विकल्यानंतर 3519करोड रुपये मिळाले होते.