पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती म्हणजे संकटाचे संधीत रुपांतराचे उत्कृष्ट उदाहरण – यशोमती ठाकूर

Update: 2020-07-18 02:32 GMT

भाऊ-बहिणीच्या स्नेहाचा धागा घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर आला असताना राखीच्या या धाग्याला पर्यावरणपूरकतेची किनार लाभली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी बनवलेल्या बांबूच्या राख्या सध्या आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. या महिलांनी आपल्या कलेतून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. या राख्या तयार करण्यासाठी बांबू, नैसर्गिक रंग, विविध रंगाचे रेशम धागे, लाकडी मनी या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

याच राख्यांच्या फोटोंसह यादीपुस्तकेचे (कॅटलॉग) राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन उद्घाटन करण्यात आलं. या वेळी पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती हे #COVID_19 परिस्थितीत संकटाचे संधीत रुपांतराचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा शब्दात या महिलांचे कौतुक केलं आहे.

Similar News