#आत्मनिर्भरभारत: कृषी, दुग्ध आणि मत्स्य विषयक उद्योगांसाठी 'या' मोठ्या घोषणा

Update: 2020-05-15 12:04 GMT

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी आज तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घोषित केलेल्या #आत्मनिर्भरभारत अभियानातील २० लाख कोटींच्या पॅकेजचं विश्लेषण केलं. शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी केली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. आजच्या पॅकेजमध्ये कृषी, दुग्ध, मत्स्य़ उद्योगांसाठी विशेष योजनांची घोषणा करण्यात आली.

हे ही वाचा...

पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या घोषणा

  • कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधेसाठी 1 लाख कोटी
  • कृषीपुरवठा साखळीसाठी अतिरीक्त 500 कोटी
  • मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपयेभाजीपाला पुरवठ्यासाठी 'ऑपरेशन ग्रीन', भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी 50 टक्के अनुदान
  • मधुमक्षिकापालनासाठी 500 कोटी रुपये, 2 लाख मधुमक्षिकापालकांना लाभ होईल
  • वनौषधींसाठी 4 हजार कोटी
  • फळ प्रक्रिया उद्योगासाठी 10 हजार कोटी
  • मत्स्यसंपदा योजनेसाठी 20 हजार कोटी
  • पाळीव प्राणी लसीकरणासाठी 13 हजार 343 कोटी
  • दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी 15 हजार कोटी
  • भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सबसिडी
  • लॉकडाउनच्या काळात भाजीपाला पुरवठ्यासाठी ऑपरेशन ग्रीन

Similar News