भैया ये गुजरात छे... सराफाने विक्रीसाठी बनवले चक्क हिऱ्यांचे मास्क

Update: 2020-07-11 03:00 GMT

सध्या मास्कचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. सोन्याचे मास्क आणि चांदीचे मास्कही पाहायला मिळाले आहेत. मात्र आता तर सुरतच्या एका सराफाने चक्क हिऱ्याने मढवलेलेले मास्क विक्रीसाठी ठेवले आहेत. सध्या सोशल मीडियावर या मास्कची जोरत चर्चा सुरु आहे.

या मास्कवर खास हिरे लावले असून, याची किंमत एक लाखांपासून ते 4 लाखांपर्यंत आहे. खास लग्न समारंभात घालण्यासाठी या मास्कना डिझाईन केले आहे. डी. खुशालभाई ज्वेलर्स नावाच्या सूरतमधील दागिन्यांच्या दुकानात नवीन जोडप्यांची ही खास ऑफर आहे. या दुकानात डायमंड-स्टडेड अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. पत्रकार जनक दवे यांनी ट्विटरवर या दुकानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'सूरत मधील हिरे व्यापारांनी डायमंडनी मढलेले मास्क तयार केले आहेत. हे मास्क खासकरुन लग्नात उठून दिसण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. लग्नात जोडप्यांसाठीही खास मास्क आहेत. या मास्कची किंमत 1 लाख ते 4 लाख रुपये आहे.’

हौसेला मोल नाही असे म्हणतात, म्हणूनच पिंपरी चिंचवड येथील शंकर कुऱ्हाडे या इसमाने चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे. साडे पाच तोळ्याचा हा मास्क बनवण्यासाठी शंकरने 2 लाख 90 हजार रुपये खर्च केले आहेत.

Similar News