कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली जागतिक अशांती आणि देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागतिक बाजारपेठेवर गंभीर पडसाद उमटत आहेत. एन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव गगनाला भीडले असल्यामुळे सोने-चांदी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. मात्र, आता पुन्हा ग्राहकांना सोन्याची खरेदी करता येणार आहे.
भारतीय बाजारपेठेत सोन्याचे भाव गडगडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार नुकतेच सोन्या-चांदीच्या दरात घसरण झालीय. सोने १२८ रुपयांनी कमी झाले असून ४४,४९० रु प्रतीतोळा सोने तर चांदीचा भाव ३०२ रुपयांनी घसरला असून ४६,८६८ प्रती किलो झाला आहे. सोने-चांदीच्या दरातील ही सलग तीसऱ्या दिवसाची घसरण आहे.
भारतातील सोन्याची निर्यात थांबली असुन औषधी व इतर वस्तुंची आयात करावी लागते आहे. परिणामी शेअर मार्केटमध्ये रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत ७४ रुपयाच्या घरात आहे. शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानंतर आता सोन्याच्या दरातही घसरण सुरु झाली आहे.