महिलांचा अर्थसंकल्प नाही तर बेरोजगारीचा संकल्प - चित्रा वाघ

Update: 2019-07-07 07:30 GMT

नुकतचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प २०१९-२० सादर केला आहे. मात्र या अर्थसंकल्पातून महिलांना नेमकं काय मिळालं यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा अर्थसंकल्प महिलांचा नसून बेरोजगारीचा असल्याच सांगत देशात सर्वाधिक महिलांचे रोजगार गेल्याचं म्हटलं आहे. तसेच पेट्रोल डिझेल यांचे भाव वाढल्याने पर्यायाने महागाई वाढणार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना आपले घर कसे चालवावे हा प्रश्न पडणार आहे. बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांचे सर्वाधिक रोजगार जात आहेत, नवीन रोजगार निर्मिती मात्र या अर्थसंकल्पातून होताना कुठेच दिसत नाही असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Similar News