एका एकरात पंचवीस भाज्या पिकवणारी अर्चना माने,कसा केला हा चमत्कार?
गृहिणी ते यशस्वी शेतकरी व आता मंजिरी प्रोड्युसर या कंपनीच्या डिरेक्टर असा प्रवास असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील मंजिरी यांचीही यशोगाथा...
घरदार व दोन मुलं असा सगळा संसाराचा गाडा हाकत अपार कष्ट करून उस्मानाबाद जिल्यातील अनसुरड येथील एका महिला शेतकऱ्याने एक एकरात 25 भाज्या पिकून आदर्श अशी भाजीपल्याची शेती केली आहे. त्यांच्या या कामामुळे त्यांनी आज अनेक महिलांना आदर्श घालून दिला आहे. परंपरागत शेतीला फाटा देऊन धाडसाने निर्णय घेत त्यांनी आज आपल्या शेतात सोनं पिकवल आहे. या शेतकरी महिलेचे नाव आहे अर्चना माने. आपल्यात काहीतरी करण्याची चिकाटी असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम केले तर कोणतीही गोष्ट अश्यक्य नाही हे अर्चना यांच्याकडे बघून लक्ष्यात येत.
अर्चना या सुरवातीला गृहिणी होत्या घरातील काम करत आपल्या दोन मुलांचे संगोपन करत त्या आपल्या संसाराचा गाडा हाकत होत्या. सुरवातीपासून त्यांना घरातून बाहेर पडण्याची इच्छा होती पण संधी अभावी त्यांना काहीच करता येत नव्हतं. ही संधी स्वयंम शिक्षण केंद्र या ठिकाणी त्यांना मिळाली व तिथून त्यांनी सेंद्रिय शेतीच प्रशिक्षण पुर्ण केले व त्यानंतर 2009 मध्ये त्यांच्या शेतात सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी हे त्यांच्यापुरतेच मर्यादित न ठेवता इतर महिलांना देखील या विषयी माहिती दिली व इथून त्यांच्या यशाचा प्रवास सुरु झाला.
सर्वात प्रथम सुरवात करत असताना अर्चना यांनी अशा प्रकारे शेती करण्यासाठी काय काय लागणार याची तयारी केली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे गुंतवण्यासाठी फार मोठं भांडवल त्यांच्याकडे नव्हतं. सुनीता सांगतात की, 'एक वेळ अशी होती की माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी व दवाखान्यासाठी माज्याकडे दीडशे रुपये सुद्धा नव्हते. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता पण स्वयंम शिक्षणच्या प्रयोगामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज 1 एक एकर मॉडेल माझ्या शेतीत केले आहे.' आता हे सगळं करत असताना त्यांच्या समोर अनेक अडचणी होत्या सुरवातीलाच एक एकरात कस करायचं? ते कसं लावेल पाहिजे? वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला कसा लावायचा? असे अनेक प्रश्न होते. प्रशिक्षणात बरीच माहिती मिळाली त्यामुळे ही शेती करत असताना फक्त त्यांनी भाजीपाला लावायचा एवढाच विचार न करता त्यात गांडूळ खत बनवणे, दशफर्नि फवारणी करणे व भाजीपाला करत असताना उरलेल्या चाऱ्याचा उपयोग व्हावा म्हणून शेळीपालन सुद्धा केले आहे. इतकंच नाही तर कोंबडीचे खत शेतीसाठी उपयोगी पडत म्हणून त्यांनी कुकुटपालन सुद्धा या ठिकणी केले आहे.
पहिला घरातील लोकांनी सुद्धा त्यांना यातुन काही फायदा होणार नसल्याचे सल्ले दिले होते पण हार मनातील त्या अर्चना कसल्या. सुरवातीला 10 गुट्यांमध्ये प्रयोग करून पाहायचं त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर मात्र नवऱ्या सोबत सर्वानाच पटलं की यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो व आपल्याला चार पैसे मिळू शकतात. अर्चना सांगतात, 'आज आम्ही महिन्याला 25 हजार रुपये कमावतो. आज अनेक लोक येतात व कस केलं विचारतात. आज आमच्या गावातच 17 महिलांनी एक एकर मॉडेल केले आहे. या प्रत्येक महिलांकडे 2 ते 3 जोड व्यवसाय आहेत. हे करत असताना प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. नेहमी फक्त भाज्या तर भाज्यांचं किंवा कडधान्य तर कडधान्यच असे न करता सोयाबीन, मूग, उदित अशी वेगवेगळी पिके घेतली पाहिजेत. हे सगळं करत असताना प्रशिक्षण घेणं हे खूप गरजेचं असुन प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणतही कार्य साध्य होत नाही. आपल्याकडील अपुऱ्या माहितीमुळे मग आपण एकाच प्रकारचे पीक घेतो. पण तसं न करता वेगवेगळ्या पीके, फळभाज्या केल्या पाहिजेत अस त्या सांगतात.
अर्चना यांच्या शेतात दोडका, कारले, दुधी भोपळा अश्या अनेक फळभाज्या पिकवल्या जातात. 12 महिने त्यांना याचे उत्पादन चालू असते. पाण्याचे नियोजन करण्यासाठी अर्चना यांनी संपूर्ण शेताला ठिबक सिंचन केलं असून पाणी जमिनीत टिकून राहावं यासाठी त्यांनी जमिनीत गांडूळ सोडले आहेत. त्यामुळे जमिनीत पाणी टिकण्यासाठी मदत होते. आशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आदर्श शेती केली आहे. आशा प्रकारे अफाट कष्ट केल्यानंतर काय होतं याचं अर्चना माने या उत्तम उदाहरण आहेत. त्या एवढ्यावरच थांबल्या नसून त्यांनी गावातील महिलांना एकत्र घेऊन मंजिरी प्रोड्युसर ही कंपनी देखील स्थापन केली आहे. या माध्यमातून ते शेंद्रिय शेती, शेंद्रिय मालाची खरेदी व विक्री त्याच सोबत शासनाच्या विविध योजना गावापर्यंत पोहचवण्याचे काम करतात. योग्य नियोजन, अथक परिश्रम व संघटितपने केलेलं काम हे कशा प्रकारे यशस्वी होऊ शकते हाच बोध यातून मिळतो