शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग शेतकरी नेहमीच राबवत असतो. अशाच प्रकारे येवला तालुक्यातील कोटमगाव येथील सोनाली कोटमे या शेतकरी महिलेने कलिंगडाच्या पिकामध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले असल्याने नक्कीच इतर पिकांपेक्षा कलिंगडात जास्त उत्पन्न मिळू शकते असे या शेतकरी महिलेने दाखवून दिले आहे.
या सोनालीने तीन एकर मध्ये टरबुजाचे पीक घेतले. सुरूवातीला अडीच लाखाच्या आसपास याला खर्च आला. पहिल्याच कलिंगडाच्या तोड्यामध्ये साडेतीन लाख रुपये झाल्याने या महिलेचा उत्पादन खर्च निघून लाख रुपये वरती नफा मिळाल्याने अजूनही एक तोडा होणार असून दोन ते अडीच लाख रुपये अजूनही मिळतील अशी अपेक्षा या महिलेला आहे. नक्कीच शेतकऱ्याने देखील कलिंगड पीक घेतल्यास कमी दिवसात चांगले उत्पन्न मिळेल असे आवाहन या महिलेने शेतकऱ्यांना केले आहे.