'प्रितमताई चं काय चुकलं...?'; समर्थकांचा सोशल मीडियावरून 'भाजप'ला सवाल

Update: 2021-07-08 02:30 GMT

मुंबई : बुधवारी मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. या मंत्रीमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड, यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. तर सुरवातीपासून नाव चर्चेत असलेल्या प्रितम  मुंडे ( pritam munde ) यांना मात्र संधी मिळाली नाही. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी असून, सोशल मीडियावर ते आपली नाराजी बोलवून दाखवत असल्याचे दिसत आहे.

भाजपला मोठं करण्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी शेवटपर्यंत पक्षासाठी एकनिष्ठेने काम केले. पण तरीही त्यांच्या दोन्ही मुलींना भाजपकडून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. तर मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात प्रितम मुंडे ( pritam munde ) यांना का डावलण्यात आले असा प्रश्न मुंडे समर्थक सोशल मीडियावर विचारत आहे. तसेच 'प्रितमताई चं काय चुकलं...?,असाही प्रश्न उपस्थित करत आहे.




 



गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे ( pankaja munde )

यांना विधानपरिषदेत संधी मिळेल म्हणून त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोलले गेले. आता पुन्हा प्रितम मुंडे यांना सुद्धा डावलून, आयारामांना संधी देण्यात येत असल्याची चर्चा मुंडे समर्थकांमध्ये आहेत.

दोन्ही बहिणींच मौन....

काल झालेल्या मंत्रिमंडळावरून पंकजा मुंडे किंवा प्रितम मुंडे दोन्ही कडून अजूनही कोणतेही प्रतिक्रिया आली नाही. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या नेत्यांना राज्यातील भाजप नेते ट्विटरवरून शुभेच्छा देत असताना, दोन्ही बहिणींकडून मात्र अजून तरी एकही वळीचं ट्विट आलं नाही. त्यामुळे 'त्या' नाराज असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

Tags:    

Similar News