गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी झटणाऱ्या सरपंच बाई अलका पवार

Update: 2019-05-21 14:02 GMT

सध्या राज्य दुष्काळाने होरपळत आहे. या दुष्काळाच्या संकंटाला सामोरं जाण्यासाठी अनेकांनी आपली महत्त्वपूर्ण कामांना थांबवत श्रमदान करण्याचे ठरवलं आहे. शहादा तालुक्यातील वीरपूर गावाने पाणी फाऊंडेशन तर्फे वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. आपलं गाव पाणीदार व्हावे यासाठी गावातील अनेक जण घाम गाळत आहेत. त्यातच या गावातील तरुण सरपंच अलका पवार हिने गाव पाणीदार करण्यासाठी स्वतःचा विवाह लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्या श्रमदानात सहभागी झाल्या.

महिला सरपंच अलका पवार ह्यांनी देखील त्यांच्या सरपंच पदाची जाणीव ठेवत त्यांच्याशी सोयरीक जुळवण्यास आलेल्या पाहुण्यांना 22 मे नंतरच लग्नाचा विचार करा असे धडधडीत उत्तर देत; "आधी लगीन पाण्याचे मग माझे " असा निर्धार केला.

गेल्या काही वर्षांपासून वीरपूर गावाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात पाण्यासाठी तात्पुरत्या सुविधा केल्या जातात परंतु कायमचाच पाणी प्रश्न मिटावा म्हणून अलका यांनी पाच साथीदारांना सोबत घेऊन पाण्यासाठी श्रमदानाचे काम सुरु केले.

Full View

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Similar News