Be kind ट्वीटर प्रोफाइल वर बी काइंड असा मेसेज देणारी दक्षिण अफ्रिकेची झोझीबीनी टुंझी हिने यंदाचा मिस युनिवर्सचा खिताब जिंकला आहे.
Zozibini Tunzi
@zozitunzi
.
आज रात्री दरवाजा उघडला आणि तो दरवाजा पार करणारी माझ्यापेक्षा दुसरी कोणी भाग्यशाली नसेल. ज्या सर्व लहान मुलींनी आज हा क्षण अनुभवला आहे, त्यांचा स्वप्नांच्या ताकदीवर कायमचा विश्वास बसणार आहे. त्या त्यांच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब माझ्या चेहऱ्यात पाहू शकतात. मी #MissUniverse2019 आहे.
झोझीबीनी चं ही ट्वीट म्हणजे संपूर्ण जगासाठी एक मोठा मेसेज आहे. दक्षिण अफ्रिकेतील केप टाऊनची रहिवाशी असलेल्या झोझीबीनीचं मिस युनिव्हर्स होणं म्हणजे सौंदर्याच्या संकल्पना बदलणारी घटना आहे. मी अशा जगात जन्माला आले ज्यात माझ्या सारखा रंग असणं किंवा केस असणं कधीच सौंदर्य मानलं गेलं नाही. मात्र आज हे सर्व इथेच थांबेल. असं झोझीबीनी म्हटलंय.
Making a statement... This is Miss Universe South Africa.#MissUniverse2019 LIVE on @FOXtv. Airing in Spanish on @Telemundo. pic.twitter.com/FWpqb0517w
— Miss Universe (@MissUniverse) December 9, 2019