अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या आणि मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव केला. विजयानंतर धनंजय मुंडे यांनी ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट करून प्रतिक्रिया दिली.
धनंजय मुंडे यांच्या विजयाच्या मागे त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांचा मोलाचा वाटा आहे. राजश्री धनंजय मुंडेंच्या संपूर्ण प्रचारात सक्रिय होत्या. ‘मागच्यावेळी लेकीला निवडून दिलं, यंदा लेकाला संधी द्या’ असे आवाहन करत राजश्री मुंडे यांनी आपल्या पतीचं नाव परळीकरांच्या मनात रुजवलं आणि परिणामी धनंजय मुंडे हे बहुमताने विजय झाले.
मिरजमध्ये राहणाऱ्या महादेव कृष्णाजी ओमासे यांच्या घरी २ नोव्हेंबर १९७८ रोजी त्यांचा जन्म झाला. घरी वडील-काका जमीनदार असल्यानं गावातील अनेक लोकांची त्यांच्याघरी ये-जा असायची. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यात आणि समाजकार्य करण्यात उमासे कुटूंब अग्रेसर होते. त्यामुळं राजश्री मुंडे यांना सामाजिक, राजकीय वातावरणाची लहानपणापासूनच सवय होती.
घरी मोकळं वातावरण असल्यानं मिळून मिसळून राहण्याची कला त्यांना अवगत झाली. त्यांच्या याच गुणाचा पुढे त्यांना भविष्यात फायदा झाला. सांगलीतील वेलींग्टन महाविद्यालयात (wellington college) राजेश्री मुंडे यांनी MA Bed ची पदवी घेतली. पुढे २००१ साली दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याशी विवाह झाला.
या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान जेव्हा राजश्री मुंडे लोकांच्या भेटीला जात, तेव्हा लोक आपुलकीनं वहिनी असं संबोधत. त्यांच्याकडे येऊन आपल्या समस्या मांडत. तेव्हा राजश्री मुंडे यांना फार कौतुक वाटायचे. धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षात असताना वेगवेगळ्या समाजिक उपक्रमांमधून सतत लोकांमध्ये रहात. परळीसह बीड जिल्ह्यातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी योजनेपासून ते सिमेंटच्या रस्त्यांपर्यंत अनेक विकासकामे त्यांनी घडवून आणली आहेत. दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो मुलींचे विवाह लावले आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा ऐतिहासिक विजय झाला. याबाबत त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना विचारले असता. मॅक्स वुमनशी बोलताना त्या म्हणाल्या की, “२४ तास लोकांसाठी स्वत:ला कामात झोकून देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणाऱ्या नेत्याला लोकांनी ओळखलं आणि भरघोस मतं देऊन त्यांना विजयी केलं याचा मला फार आंनद आहे. निवडणुकीपूर्वीपासून मला अंदाज होता आणि तसा आत्मविश्वास देखील होता की, यावेळेस धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित आहे. कारण जेव्हा मी प्रचारासाठी लोकांच्या भेटी घेत होते. तेव्हा साहेबांनी केलेल्या कामांमुळे आपुलकीचं नात निर्माण झालं होत. त्यामुळे लोक मला देखील आपल्यातीलच एक मानत होते.”
नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत प्रचारासाठी विरोधकांनी देशाचे गृहमंत्री आनले उपयोग झाला नाही. देशाचे प्रधानमंत्री आणून धनंजय मुंडे यांच्या घरासमोर सभा घेतली तरी काही उपयोग झाला नाही. नंतर मराठा मतदारांमध्ये फुट पाडण्यासाठी छत्रपती उदयन महाराज बोलावले तरी काहीही फरक पडला नाही. त्यानंतर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पंकजा मुंडे यांच्या बाबत धनंजय मुंडे यांनी अपरिहार्य शब्दात टीका केल्याचा बनावट व्हिडीओ व्हायरल करून शेवटचे शस्र वापरले होते. त्यामुळे त्यांना अनेकांच्या टीकांना सामोरे जावं लागत होत. परंतू धनंजय मुंडे यांनी केलेली विकासकामांची जाण आणि शुद्ध चारित्रय डोळ्या समोर ठेऊन लोकांनी आपले मतरुपी आशीर्वाद धनंजय मुंडे यांच्या पारड्यात टाकले. त्याचबरोबरीनं त्यांच्या पत्नी म्हणजेच किंगमेकर राजेश्री मुंडे यांचा आत्मविश्वास आणि त्यांनी प्रचारादरम्यान दिलेली साथ यामुळे धनंजय मुंडे यांचा विजय झाला.