#Toolkit- "मानवी हक्कांबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही"
"मानवी हक्कांबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही" दिशा रवीच्या समर्थनार्थ स्वीडीश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केलं आहे.
Toolkit प्रकरणी दिशा रवी या पर्यावरणवादी तरुणीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ग्रेटा थनबर्गने जे टूलकिट ट्विट केले होते, ते टूलकिट तयार केल्याप्रकरणी दिशा रवीला पोलिसांनी अटक केली आहे. दिशाच्या अटकेला देशभऱातून विरोध होत असताना आता ग्रेटा थनबर्गनेही दिशाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे.
"अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार या मानवी हक्कांबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. हे अधिकार लोकशाहीचे अविभाज्य अंग आहेत." असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ग्रेटा थनबर्ग ही एक स्वीडीश पर्यावरणवादी कार्यकर्ती आहे. ग्रेटाने दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर तिच्यावर सरकार समर्थकांनी टीका केली होती. पण या टीकेनंतर हे आंदोलन जगभरात पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेले टूलकिट ग्रेटाने ट्विट केले होते. या टूलकिटमध्ये सरकारविरोधी कट असल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी या टूलक्रिटप्रकऱणी दिशा रवीला अटक केली आहे. तर तिची सहकारी निकीता जेकब आणि शंतनू मुळूक या दोघांविरोधातही अटक वॉरंट जारी केले आहे. पण या दोघांना कोर्टाने दिलासा देत त्यांना अटकेपासपून तात्पुरते संरक्षण दिले आहे.