तुमचा पार्टनर क्रुर तर नाही ना ? ही आहेत पाच लक्षणे

Update: 2024-05-26 06:38 GMT

जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहात मग ते लग्नाआधीच्या रिलेशन मध्ये असो किंवा लग्नानंतरच्या नातेसंबधात असो त्या पार्टनरमध्ये एक गोष्ट पाहणे हे खुप महत्वाचे असते ते म्हणजे तो व्यक्ती तुमच्याशी नेमकं कश्याप्रकारे वागतो, कारण प्रेम म्हटलं की त्यामध्ये काळजी येतेचं परंतू जर तुमचा पार्टनर तुमची जास्तीच काळजी किंवा तुमच्यावर जास्तीच लक्ष ठेवून असेल तसेच कोणत्या दुसऱ्या व्यक्तीशी बोलल्या नंतर त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये जर संशयाची भावना निर्माण होत असेल . तर मात्र सावधगिरी बाळगणे खुप महत्वाचे आहे.

कारण याचे परिणाम तुमच्या रिलेशनवरती खुप मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्या व्यक्तीची तीच काळजी किंवा ओवर पजेसिवनेस एका वेगळ्या वळणावर तुमच्या पार्टनरला घेऊन जाऊ शकतो. म्हणजेच तो किंवा ती क्रुरतेने देखील वागण्यास भाग पडू शकते त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये येता तर त्या व्यक्तीचा नेमका स्वभाव व तो व्यक्ती कसा हे पाहणे देखील महत्वाचे आहे. तसेच हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे आहे की त्याचे तुमच्यावर प्रेम आहे की फक्त तुमच्या शरीरावर प्रेम आहे. हे देखील पार्टनरमध्ये पाहणे तितकेच गरजेचे आहे.

तसेच जर तुमचा पार्टनर सतत तुमच्यावर संशय घेत असेल तर तो कुठल्याही पातळीला जाऊ शकतो. व कुठल्याही प्रकारे हिंसा देखील करु शकतो. तर ही आहेत पाच लक्षणे क्रुरपणे वागण्याची :

१. सतत संशय घेणे

२. कोंडून ठेवणे

३. मानसिक छळ करणे

४. शाररिक छळ करणे

५. बेदम मारहाण करणे

६. मारहाण करुन मरणप्राय यातना देणे

७. तुमच्यावर प्रेम न करता तुमच्या शरीरीवर प्रेम असणे

अश्याप्रकारे किंवा यापेक्षा जास्त क्रुरप्रवृत्तीचा जर तुमचा पार्टनर असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. तसेच योग्य तो वकिलांचा किंवा मानसउपचार तज्ञांचा सल्ला घेणे अवश्यक आहे. तसेच तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलणे देखील महत्वाचे आहे.

जर तुमच्या आजूबाजूला अश्या विकृतीचे लोक असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य ती कारवाई केली पाहिजे.

Tags:    

Similar News