आमच्या प्रत्येक जगण्यावर डॉ. बाबासाहेबांचा अधिकार आहे. आपण लिहिलेल्या संविधानामुळे समाजातील शोषितांना मोकळा श्वास घेण्याची संधी प्राप्त झाली. जातपंचायती खापपंचायती या पुरुषप्रधान व्यवस्थेने आमच्या सारख्या शोषित महिला आणि मागास घटकांना दाबून ठेवण्याचा काटोकाट प्रयत्न केला. आपण निर्माण केलेल्या संविधानामुळे या पुरुषप्रधान व्यवस्थेला मी खंबीरपणे सामोरे जात आहे. माझा हा लढा जातीव्यवस्थेविरोधात आहे. माझ्या या लढाईत संविधान माझा पाठीराखा आहे. या देशात जो काही शोषित घटक जगत आहे ते फक्त संविधामुळे आहे. आम्हाला समाजात समानतेची वागणूक मिळवून दिली. आमच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेबांची सही आहे. असं म्हणतं सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा गुडिलू यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे.