आशा सेविकांच्या आंदोलनाचा आज आठवा दिवस

सरकारला अजून तोडगा सापडेना;

Update: 2021-06-22 08:30 GMT

"केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळावा" या मागणिसाठी राज्यातील 70 हजार आशा सेविका 15 जून पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. आज या संपाचा आठवा दिवस. कोरोना काळात आठ आठ तास काम करुनही त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने त्या आता बेमुदत संपावर गेल्या आहेत.

एकीकडे मुख्यमंत्री आपल्या भाषणात "'आशा' सेविका लढवय्या आणि वीरांगणा आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो" असं म्हणतात आणि दुसरीकडे त्यांच्या कामाचे पैसे दिले जात नाहीत.

त्यामुळे आता येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही या रिअल कोरोना वॉरीयरचा संप असाच सुरु राहिल्यास तिसऱ्या लाटेत राज्याची खुप हानी होवू शकते.

काय आहेत आशा सेविकांच्या मागण्या

जगण्यासाठी किमान वेतन द्यावे

कोरोना संबंधित काम करण्या साठी पाचशे रुपये प्रतिदिन याप्रमाणे विशेष भत्ता द्यावा

आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना प्राधान्य देण्यात यावे

शासनाच्या आरोग्य विभागातील नोकर भरतीत आशा सेविका व गटप्रवर्तक यांना राखीव जागा ठेवाव्यात

जननी सुरक्षा योजनेचा सरसकट लाभ द्यावा

Tags:    

Similar News