बांधकाम कामगारांच्या मुलांना किंवा पत्नीला मिळतात १ लाख

Update: 2023-02-10 08:22 GMT

नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारांच्या मुलांना किंवा त्याच्या पत्नीला शासनमान्य वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेशासाठी ,पुस्तके आणि इतर शैक्षणिक खरेदीसाठी आर्थिक साहाय्य दिले जाते . प्रति शैक्षणिक वर्षी अनुक्रमे १०००००आणि ६०००० इतकं अर्थसाह्य केलं जात. दोन पाल्यांस किंवा पत्नीस हा लाभ होतो.


त्यासाठी काही आवश्यक कागतपत्रांची पूर्तता करावी लागते ,जी खालीलप्रमाणे आहेत

१)नोंदणी पावती

२)मंडळाचे ओळखपत्र

३)बँकेचे पासबुक

४)रहिवासी पुरावा जस कि रेशन कार्ड, लाईट बिल

५)शाळेत शिकत असल्याबाबतची बोनाफाईड दाखल्याची मूळ प्रत

६)कामगाराच्या नावे आधारकार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅनकार्ड

७)पासबुक

८)मुलाचे शाळेचे ओळखपत्र

९)मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक

१०)शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या पावत्या

११)शैक्षणिक साहित्य खरेदीच्या पावत्या सोबत जोडाव्या लागतात.

जिल्हा सहाय्य्क कामगार अधिकारी यांच्याशी संपर्क करावा लागतो .तसेच mahabocw.in या वेबसाईटवर योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेता येते .

Tags:    

Similar News