कश्मिरा गोविंदाच्या पाया पडेन असं का म्हणाली ?
अभिनेता गोविंदा हजेरी लावणार की नाही असा प्रश्न सध्या सगळ्या चाहत्यांना पडला आहे? याबाबत कश्मिराने एका मुलाखतीत खुलासा केला.;
आरती ही दीपक चौहान या व्यवसायिकासोबत लग्नगाठ बांधणार आहे. आरती ही अभिनेता गोविंदाची भाची असून,अभिनेता कृष्णा अभिषेकची बहीण आहे. आरती सिंहचं उद्या म्हणजे 25 एप्रिलला लग्न आहे. आरतीचा भाऊ कृष्णा आणि वाहिनी कश्मिरा लग्नाच्या तयारीत बिझी आहेत. या लग्नाला अभिनेता गोविंदा हजेरी लावणार की नाही असा प्रश्न सध्या सगळ्या चाहत्यांना पडला आहे. याबाबत कश्मिराने एका मुलाखतीत स्पष्टचं बोलत भावुक होतांना दिसली आहे.
"आम्ही लग्नाला त्यांचं स्वागत करायला उत्सुक आहोत".
गोविंदा आणि कृष्णामध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरु असून ते दोघेही एकमेकांशी बोलत नाहीयेत. बऱ्याचदा हा वाद अनेक मुलाखतींमध्येही चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कृष्णा हा वाद मिटवण्याचा प्रयत्नात आहे. त्याने गोविंदाला बहिणीच्या लग्नाची पत्रिकाही पाठवली असून अत्यंत आदराने त्याने लग्नाचं आमंत्रण त्याला दिलं आहे. याबाबत पिंकव्हीला या वेबसाईटने कृष्णाची बायको कश्मिराला प्रश्न विचारला असता ती म्हणाली,"आम्ही लग्नाला त्यांचं स्वागत करायला उत्सुक आहोत. आम्ही खूप आदरपूर्वक त्यांचं स्वागत करणार आहोत. परंपरेप्रमाणे, मी पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेईन कारण ते मला माझ्या सासऱ्यांच्या स्थानी आहेत आणि त्यांचा मी तसाच आदर करते. त्यांना कदाचित माझ्या आणि कृष्णाविषयी अडचणी असतील पण आरतीचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही आणि त्यामुळे मला असं वाटतंय कि ते या लग्नाला उपस्थित राहतील."
"हा आमच्यासाठी भावूक करणारा क्षण आहे
आरतीच्या लग्नाबाबत सांगतात कश्मिरा थोडी भावुकही झाली. ती म्हणाली,"हा आमच्यासाठी भावूक करणारा क्षण आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही सगळे खूप इमोशनल झालो होतो. अगदी हळदी समारंभावेळीही आमच्या डोळ्यात पाणी होतं. मी आरतीला गेल्या अठरा वर्षांपासून ओळखतेय आणि ती एका इतक्या चांगल्या मुलाशी लग्न करतेय याचा मला खुप आनंद होतोय. अर्थात आता ती दुसऱ्या कुणाची तरी पत्नी बनून हे घर सोडून ही गोष्ट आम्हाला भावूक करणारी आहे."
आरती वयाच्या 39 व्या वर्षी लग्न करत असून तिचा मेहेंदी, हळद आणि संगीत समारंभ थाटात पार पडला. 25 एप्रिलला जुहूच्या इस्कॉन मंदिरात आरती लग्न करणार आहे.