Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझ यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Update: 2025-01-02 06:39 GMT

पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी बुधवारी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या बैठकीला 2025 ची एक विलक्षण सुरुवात असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांसोबतच्या भेटीचे फोटो दिलजीत दोसांझ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर पंतप्रधानांसोबतचे फोटो शेअर करत दिलजीत दोसांझ यांनी लिहले आहे की, “२०२५ ची एक विलक्षण सुरुवात. पंतप्रधान @narendramodi जी यांच्यासोबतची एक अविस्मरणीय भेट. आम्ही अर्थातच संगीतासह बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो!”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलजीत दोसांझ यांच्या पोस्टला प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “दिलजीत दोसांझसोबत चांगला संवाद झाला! तो खरोखर सर्वगुणसंपन्न आहे, प्रतिभा आणि परंपरा यांचे मिश्रण आहे.

पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान काळा कोट आणि काळी पगडी परिधान केली होती. हातात पुष्पगुच्छही दिसतो आहे. 

Tags:    

Similar News