आता हा भावी आमदार कोण?

who will become next MLA;

Update: 2023-02-08 13:11 GMT

राजकारण म्हटलं की खुर्ची साठी स्पर्धा ही आली.पद, नेते कार्यकर्ते या सगळ्या गोष्टींमधून सरस ठरतो तो विजेता .आमदार होणं हे सोप्प काम नाही आहे. पण आमदार होण्यासाठी काय काय करावं लागतं ? या सगळ्याचा सारांश देणारं भावी आमदार हे गाणं रिलीज झालं आहे.

"जग्गु आणि जुलियट"या सिनेमातील हे गाणं आहे बऱ्याच दिवसानंतर उपेंद्र लिमये या पद्धतीच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे.अजय -अतुल यांच्या या गाण्याने जबरदस्त धुमाकूळ घातला आहे .एक आठवड्यात 3.3मिलियन इतक्या views या गाण्याला मिळाल्या आहेत . उपेंद्र लिमये यांच्या अभिनयामुळे मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळंच वलय तयार झालं होतं ,आता त्याच उत्साहाने आणि ऊर्जेने उपेंद्र लिमये गाण्यात नृत्य आणि अभिनय करताना दिसत आहे ." आला भावी आमदार न्यूज रूमला" अशी या गाण्याची सुरुवात आहे .उपेंद्र सोबत अमेय वाघने सुद्धा या गाण्यात नृत्य केला आहे. दोघांचा उत्साह हा पाहण्याजोगा आहे.

जग्गू आणि जुलीयट हा मराठी सिनेमा अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी या दोघांचा लव स्टोरी सांगणारा सिनेमा आहे .यामध्ये जग्गु हा बिनधास्त मुलगा दाखवला आहे ,तर जुलीयट फॉरेन रिटर्न असून भारत फिरायला आलेली दाखवली आहे. यामधील जग्गू म्हणजेच अमेय वाघचे डायलॉग हे फार चर्चेत आहेत आणि नुकतंच भावी आमदार या गाण्याने पुन्हा एकदा हा सिनेमा चर्चेत आला आहे.

Tags:    

Similar News